HW News Marathi
देश / विदेश

मातृशोकानंतर नियोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची हजेरी

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आई हिराबेन मोदी यांचे आज निधन झाले. पंतप्रधानांची आई हिराबेन (Heeraben Modi) यांचे आज (30 डिसेंबर) पहाटे 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधानांनी आई हिराबेन निधनाची बामती ते भल्या पहाट गांधीनगर येथील त्यांच्या घरी पोहचले. यानंतर पंतप्रधानांनी आईच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. पंतप्रधानांनी आईच्या पार्थिवाला खांदा देत गांधीनगरच्या स्मशानभूमीत घेऊन गेले. हिराबेन यांच्या अंत्ययात्रेत गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, पंतप्रधानांनी आईचा अंत्यसंस्कार पार पडला. पंतप्रधानांना मातृशोक असतानाही तासाभरात पुन्हा कामला सुरुवात केली. पंतप्रधानांनी नियोजित कार्यक्रमात खंड पाडला नाही. पंतप्रधान अहमदाबादच्या राजभवनात जाऊन पश्चिम बंगालमधील वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटन कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली.  हावडा ते न्यू जलपाईगुडी वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  हिरवा झेंडा दाखवला आहे. यावेळी पंतप्रधानांनी स्वत: तिथे उपस्थित नसल्याबद्दल जनतेची माफी मागितील. या कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या.

वंदे भारत एक्सप्रेसला हिंरवा कंदील दाखविल्यानंतर गंगा कौन्सिलची बैठक या दोन्ही नियोजित कार्यक्रमात हजेरी लावली. या दोन्ही कार्यक्रमात पंतप्रधानांनी ऑनलाईन हजेरी लावली. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या, “पंतप्रधान आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत दुख:त दिवस आहे. मी ईश्वराकडे प्रार्थना करते की, तुम्हाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती लाभो.”

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री सहायता निधीत ९३ कोटी जमा, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

News Desk

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला, एक जवान जखमी

News Desk

अन् मजूर झाला करोडपती

News Desk