HW News Marathi
देश / विदेश

#CoronaVirus | कोरोनामुळे युरोपमध्ये राजघराण्यातील पहिला मृत्यू

नवी दिल्ली | संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, आता युरोपला मोठा धक्का बसला आहे. स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचे कोरोनामुळे निधन झाल्याची समोर येत आहे. त्या ८६ वर्षांच्या होत्या. मारिया यांचे भाऊ राजकुमार सिक्टो एनरिक डी बोरबोन यांनी फेसबुकच्या माध्यमातून राजकुमारी मारिया यांच्या निधनाची माहिती दिली आहे. कोरोनामुळे कोणत्या राजघराण्यातील व्यक्तीचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे.

स्पेनचे राजे फेलिपे सहावे हे मारिया टेरेसा यांचे भाऊ आहेत. नुकतीच फेलिपे यांची देखील कोरोना चाचणी झाली होती. मात्र, त्यांची चाचणी कोरोना निगेटिव्ह आली आहे. त्यानंतर, आता त्यांची बहीण मारिया टेरेसा यांचे पॅरिस शहरात निधन झाल्याची बातमी आली आहे. दरम्यान, शुक्रवारी (२७ मार्च) मॅड्रिड येथे मारिया टेरेसा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आपल्या स्वतंत्र विचारांसाठी मारिया टेरेसा अत्यंत लोकप्रिय होत्या. रेड प्रिन्सेस अशी त्यांची ओळख होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘येस बँके’चे माजी सीईओ राणा कपूर यांना प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने केली अटक

swarit

जीएसटीचा सर्वसामन्यांना भूर्दंड, ग्राहकांच्या खिशाला कात्री

News Desk

सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी !

News Desk