HW Marathi
देश / विदेश राजकारण

पुलवामा हल्ला केवळ मतांसाठी घडवून आणला होता !

नवी दिल्ली | “जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ला हा केवळ मतांसाठी घडवून आणलेला हल्ला होता. आता याबाबत फार बोलणार नाही. मात्र, सरकार बदलल्यानंतर या प्रकाराची चौकशी होईल. बड्या-बड्या व्यक्ती यात अडकतील”, असे धक्कादायक वक्तव्य समाजवादी पार्टीचे महासचिव राम गोपाल यादव यांनी केले आहे. जम्मू-काश्मीरमधील येथील पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला सीआरपीएफ जवानांवर झलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी देखील स्वीकारली. मात्र, आता यावरून विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे.

सत्ताधारी भाजपनेच आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केवळ मतांच्या गणितांसाठी हा हल्ला घडवून आणला असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. “सरकारने केवळ मतांसाठी जवानांना मारले आहे. हेतुपूर्वक जवानांना सध्या बसमधून पाठवण्यात आले होते. मी आता सध्या याबाबत काही सांगू शकत नाही. मात्र, जेव्हा सत्तापालट होईल तेव्हा दुसरे सरकार याबाबतची चौकशी करेल. तेव्हा या प्रकरणात बडेबडे लोक अडकतील”, असा दावा राम गोपाल यादव यांनी केला आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांनी देखील याआधी अशाच प्रकारचा आरोप केला होता. “भारताचे पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलावामा दहशतवादी हल्ला फिक्स केला होता. त्यांची हातमिळवणी झाल्याशिवाय हे शक्यच नाही”, असा आरोप हरिप्रसाद यांनी केला होता. त्याचप्रमाणे, याबाबत पंतप्रधान मोदींनी स्पष्टीकरण द्यावे अशीही मागणी हरिप्रसाद यांनी त्यावेळी केली होती.

Related posts

युतीचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी भाजप-शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका सुरु

News Desk

भाजपच्या उमेदवाराचा अमर्याद खर्च, निवडणूक आयोगाने लक्ष घालावे

News Desk

शेतक-यांनी तूर खरेदीबाबत कोणतीही चिंता करु नये | सुभाष देशमुख

News Desk