HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : अमेरिका दहशतवादविरोधी लढाईत भारतासोबत !

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात दशतवाद्यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले असून २० हून अधिक जवान जखमी आहेत. या दशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण जगभरातील देशांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत अमेरिका दहशवादाविरोधी लढाईत भारतासोबत असल्याचा विश्वासही दिला आहे. “आम्ही शहीद जवानांच्या कुटूंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. आमची प्रार्थना आहे कि जे जखमी आहेत त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी”, अशी भावनाही यावेळी व्यक्त केली आहे.

“अमेरिका दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत आहे. पाकिस्तानस्थित दशहतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हे एक अत्यंत क्रूर आणि लज्जास्पद कृत्य आहे. आम्ही देशांना सांगू इच्छितो कि त्यांनी यूएन सिक्युरिटी कौन्सिलच्या ठरावाचा स्वीकार करावा आणि आपल्या देशात अशा दहशतवाद्यांना थारा देणे बंद करावे”, असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुतारेस यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. “आम्ही जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करतो. भारतातील शहीद जवान आणि भारतातील लोकांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. आम्ही जखमींच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करतो. आम्ही जैश-ए-मुहम्मद या संघटनेवर बंदी आणण्याच्या भारताच्या प्रस्तावाचे समर्थन करत करतो”, असे एंटोनियो गुतारेस यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Cyclone Tauktae : गुजरातसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची १००० कोटींच्या मदत निधीची घोषणा!

News Desk

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ वेळीच समजून घेतली असती तर…

News Desk

अयोध्येतील राम मंदिरासाठी तोगडियांचे बेमुदत उपोषण

News Desk