HW News Marathi
देश / विदेश

अयोध्येतील राम मंदिरासाठी तोगडियांचे बेमुदत उपोषण

नवी दिल्ली | अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासंदर्भात मोदी सरकारवरील दबाव सध्या वाढताना पहायला मिळत आहे. विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर प्रवीण तोगडिया यांनी राम मंदिर उभारणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

तोगडिया यांनी मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेताना राम मंदिर उभारणीसंदर्भात वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. राम मंदिर बांधणीच्या मागणीला घेऊन तोगडिया यांनी मंगळवारपासून (17 एप्रिल) बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

यापूर्वी तोगडियांनी 32 वर्षांपर्यंत विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेचे नवीन अध्यक्ष एस.कोकजे यांनाही आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा आग्रह तोगडिया यांनी केला आहे. कोकजे यांनी एक तर उपोषणामध्ये सहभागी व्हावे किंवा त्यांनी राम मंदिर निर्माणासंबंधी संसदेत विधेयक आणण्यासाठी दबाव निर्माण करावा, अशी मागणी तोगडिया यांनी केली आहे. तोगडिया म्हणाले, विश्व हिंदू परिषदेने म्हटले होते,संघ परिवाराला संसदेत बहुमत मिळाले तर आम्ही विधेयक संमत करून राम मंदिर उभारण्याचा मार्ग सुकर करु.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आल्यामुळे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना लागण होण्याची शक्यता

swarit

लवकरच लागू होणार ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना

swarit

मोदीच्या टपरीचे रूप पालटणार

News Desk