HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : ‘कपिल शर्मा शो’मधून सिद्धू उचलबांगडी

मुंबई | पुलवामामध्‍ये झालेल्‍या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राजकारणापासून देशाच्‍या कानाकोपर्‍यापर्यंत या हल्ल्याची दु:खाची लाट पसरली आहे. नेते आणि माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांच्‍या वक्‍तव्‍यानंतर देशवासीयांकडून संताप व्‍यक्‍त होत आहे. यानंतर सोशल मीडियावर लोक ‘द कपिल शर्माचा शो’ बंद करण्‍याची मागणी करत आहेत. इतकेच नाही तर युजर्सनी ट्विटरवर बायकॉट कपिल शर्मा आणि #boycottsidhuचा ट्रेंडदेखील सुरू केला आहे.

दरम्यान सिद्धूच्या जागी अर्चना पुरणसिंगची द कपिल शर्मा शोमध्ये एन्‍ट्री होणार असल्‍याची माहिती मिळाली आहे. पुलवामा हल्‍ल्‍यावर सिद्धू यांच्‍या वक्‍तव्‍यानंतर नेटिझन्सकडून कपिल शर्माचा शो बंद करण्‍याची मागणी होत आहे. त्याचबरोबर, शोमध्‍ये सिद्धू यांना हटवल्‍यानंतरच आम्‍ही कपिलचा शो पाहू, असे नेटिझन्सनी म्‍हणाले होते. प्रक्षेकांच्या या मागणीमुळे सिद्धूना शोमधून हटविण्यात आली.

सिद्ध नेमके काय म्हणाले

पुलवामामध्‍ये सीआरपीएफ जवानांवर दशहतवादी हल्‍ल्‍यानंतर ४० जवान शहीद झाले आहेत. या हल्‍ल्‍याची जबाबदारी दहशतवादी संघटना जैश-ए- मोहम्मदने स्वीकारली आहे. या हल्‍ल्‍याबाबत सिद्धू म्‍हणाले होते की, काही लोकांसाठी संपूर्ण देशाला जबाबदार कसे ठरवले जाऊ शकते? आपण कुणा व्‍यक्‍तीला जबाबदार ठरवू शकतो का? हा भ्‍याड हल्‍ला होता. मी याचा निषेध करतो. ही घटना निंदनीय आहे. आणि ज्‍यांनी हे केले आहे, त्‍यांना शिक्षा मिळायलाच हवी. पंजाब विधानसभाचे कामकाज स्थगित झाल्यानंतर सिद्धू यांनी प्रसारमाध्‍यमांशी बोलताना हे वक्‍तव्‍य केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मास्क, हॅन्ड सॅनिटायझरवर जीएसटी कर कोरोनाच्या काळात आकारु नका

News Desk

देशातील ४० व्या संचार उपग्रहाचे प्रक्षेपण

News Desk

पीएसआयचा गळा चिरला, बोटे कापली

News Desk