नवी दिल्ली | अमेरिकेने पुलवामा हल्ल्याचा निषेध व्यक्त केला असून जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. यानंतर त्यांनी अमेरिका भारताच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले. सीमेरेषवर दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्याचे भारताला पूर्ण अधिकार असल्याचे बोल्टन यांनी म्हटले आहे.
US National Security Advisor John Bolton supported India's right to self-defence against cross-border terrorism. He offered all assistance to India to bring the perpetrators and backers of the attack promptly to justice. NSA Doval appreciated US support. #PulwamaAttack https://t.co/jYG6KgeDXn
— ANI (@ANI) February 16, 2019
मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर केले जातील अशी ग्वाही देखील अमेरिकेने भारताला दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बैठीत या अडचणीच्या गोष्टी दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना आश्रय मिळत आहे. ही चिंतेची बाब असून पाकिस्तानामधील दहशतवाद्यांचे जाळे मोडून काढण्याची गरज असल्याचे बोल्टन यांनी म्हटले आहे.
अमेरिका दहशतवाद कमी करण्यासाठी भारताला पाठिंबा देणार असल्याचे बोल्टन यांनी स्पष्ट केले आहे. शहीद जवानांना न्याय मिळवून देण्यासाठी भारताचा जी काही मदत लागेल ती सर्वप्रकारची मदत करण्यास अमेरिका तयार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेच्या सहकार्याबद्दल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल यांनी त्यांचे आभार मानले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.