नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी जबाबदारी पाकिस्तानस्थित दशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद यांनी घेतल्यानंतर पाकिस्तानला जगभरातून होणाऱ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. याच हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी (१६ जानेवारी) क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडून (सीसीआय) त्यांच्या हॉटेलमधील पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो झाकण्यात आला तसेच पाकिस्तान सुपर लीगचे भारतातील प्रसारण बंद केले. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (पीसीबी) तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
IMG Reliance the production company of ongoing PSL will discontinue further production of PSL and new production company will take over soon.#HBLPSL
— Muhammad Noman (@Nomancricket29) February 17, 2019
”खेळ आणि राजकारण हे वेगळे ठेवणे आवश्यक आहे.या दोन्ही देशांतील संबंध कायमच ‘क्रिकेट’च्या माध्यमातूनच सुधारत आले आहेत. भारतीय क्रिकेट चाहत्यांना पाकिस्तान सुपर लीगचे सामने पाहता न येणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांचा क्रिकेट क्लब ऑफ इंडियामधील फोटो झाकणे हे देखील खेदजनक आहे”, असे पीसीबीचे व्यवस्थापकीय संचालक वासिम खान यांनी म्हटले आहे. आयएमजी रियायन्सने देखील भारतात ‘पाकिस्तान सुपर लीग’चे प्रसारण करण्यास नकार दिला. दुबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत याबाबत आपण बीसीसीआय आणि आयसीसीकडे तक्रार करणार असल्याचे वासिम खान यांनी म्हटले आहे.
#Visuals: Cricket Club of India covers Imran Khan's photo at CCI Headquarters in Mumbai in wake of #PulwamaAttack. pic.twitter.com/H1Ymk71sfA
— ANI (@ANI) February 17, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.