HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : ‘उरी’च्या कलाकारांनी देखील व्यक्त केला निषेध

मुंबई | काश्मीरच्या पुलवामामध्ये ३८ सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करत संताप व्यक्त होत आहेत. जानेवारी महिन्यात सर्जिकल स्ट्राईक यावर आधिरत असलेले ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमातील कलाकारांनी ट्विटवर सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. “ही संपूर्ण देशसाठी खूप दु:खद घटना असून दहशतवादी हल्ल्यात जे सीआरपीएफ जवान शहीद झाले आहे. शहीद झालेल्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी झालो आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, हीच प्रार्थना’ असे अभिनेता विकी कौशलने ट्विटरवर म्हटले आहे.”

उरी या सिनेमात भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या घटनेचे चित्रण करण्यात आले आहे. ‘ये नया हिंदुस्थान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी’ अशी या सिनेमाची टॅगलाईन होती. विकीने पॅरामिलीट्रीतील मेजर विहान सिंह शेरगिलची व्यक्तिरेखा साकारली होती. विकी त्याच्या पथकातील जवानांना ‘हाऊज द जोश’ असे प्रश्न विचारल्यावर ‘हाय सर!’ असे जोशपूर्ण उत्तर मिळते. सिनेमातील या संवादाने प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. या सिनेमात मेजर करण कश्यपची भूमिका साकारणारे अभिनेता मोहित रैनानेही ‘या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला असून भारताच्या वीर जवानांच्या आत्म्याला शांती लाभो, असे ट्विट केले आहे.

 

काश्मिरच्या पुलवामा भागात गुरुवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला केला होता. हा देशाच्या इतिहास सीआरपीएफ जवानांवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो. आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा सुसाईड अटॅक घडवून आणला आहे. आदिल हा गेल्या वर्षी दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडला असल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखयांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, धक्का मिळणार की दिलासा?

News Desk

कोरोनाच्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी केंद्राची ४ डिसेंबरला बैठक होणार

News Desk

शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या शिरोमणी अकाली दलचे शरद पवारांनी केले अभिनंदन!

News Desk