पंजाब | देशाला हादरून सोडणाऱ्या कठुआ बलात्कार प्रकरणी आज (१० जून) सकाळी ११ वाजता पठाणकोट न्यायालयात निकाल लागणार आहे. गेल्या वर्षी १० जानेवारी रोजी आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे पठाणकोट न्यायालया बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. या प्रकरणी पंधरा पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आहे. या प्रकरणाची ३ जून रोजी सुनावणी पार पडली.
Punjab: Security heightened outside Pathankot court ahead of verdict in Kathua rape-murder case pic.twitter.com/XaCdsSMnKd
— ANI (@ANI) June 10, 2019
पठाणकोटमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात गेल्या वर्षी जून महिन्यापासून या प्रकरणावर दररोज सुनावणी झाली. बलात्कार आणि खून प्रकरणाचा आरोप आठपैकी सात आरोपींवर ठेवण्यात आला आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणात गावाचे प्रमुख सांजी राम, त्यांचा मुलगा विशाल, अल्पवयीन भाचा, विशेष पोलिस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंदर वर्मा यांना अटक करण्यात केली आहे. हेड कॉन्स्टेबल टिळक राज आणि उपनिरीक्षक आनंद दत्ता यांनाही अटक करण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.