HW News Marathi
देश / विदेश

पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

डेहराडून | पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार असून अशात उत्तराखंडच्या तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं म्हणजे चिंतेंची बाब होती. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण असा प्रश्न उद्वभवला असता त्याचे उत्तर समोर आले आहे. उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राज्याचे 11 मुख्यमंत्री म्हणून ते आजच शपथ घेणार आहेत.

पुष्कर सिंह धामी हे ऊधमसिंह नगर जिल्ह्यातील खटीमा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पक्षातील तरुण आणि अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणूनही धामी यांची ओळख आहे. भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा; राज्यपालांची घेतली भेट

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. रावत यांनी राज्यपाल बेबी रानी मौर्य यांची संध्याकाळी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. राजीनामा दिल्यानंतर रावत यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदासाठी संधी दिल्याबद्दल पक्षाचे आभारही मानले. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो. केंद्रीय नेतृत्वानं वेळोवेळी मला संधी दिली. यासाठी मी नेतृत्वाचे आभार व्यक्त करतो,” अशी प्रतिक्रिया रावत यांनी राजीनाम्यानंतर दिली. त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होणं निश्चित आहे. यासाठी शनिवारी भाजपच्या राज्य विधीमंडळाच्या दलाची बैठक पार पडणार आहे. यामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या नव्या चेहऱ्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्रिपुरामधील कम्युनिस्टांचे सरकार उलथवून टाका –  रामदास आठवले

swarit

राज्यातील सत्तांतरावरील आजची सुनावणी संपली; सर्वोच्च न्यायालयात ‘या’ तारखेला होणार सुनावणी

Aprna

धोका टळला | चीनचे स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात कोसळले

News Desk