HW News Marathi
देश / विदेश

पी व्ही सिंधू ‘सुवर्ण’ पदकाच्या शर्यतीतून बाद, भारताच्या पदरी निराशा!

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भारताच्या पी व्ही सिंधूला उपांत्य फेरीत चायनीस तैपेईच्या ताय झू यिंगकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. पहिल्या गेममध्ये चुरशीची टक्कर पाहायला मिळाल्यानंतर ताय झूनं दुसऱ्या गेममध्ये तुफान खेळ केला. तैपेईची खेळाडू सिंधूला तिच्या तालावर नाचवताना दिसली अन् त्यामुळेच भारतीय खेळाडूंकडून चुंकामागून चुका होत गेल्या. उपांत्य फेरीतील पराभवानंतर सिंधू सूर्वणपदकाच्या शर्यतीतून बाद झाली आहे, परंतु तिला कांस्यपदक जिंकण्याची अजूनही एक संधी आहे.

पी व्ही सिंधू आणि चायनीस तैपेईच्या ताय झू-यिंग यांच्यातली जय-पराजयाची आकडेवारी ही यिंगच्या बाजूनं १३-५ अशी आहे. त्यामुळे भारताच्या सिंधूवर सुरुवातीपासून दडपण होतेच. मात्र, उपांत्यपूर्व फेरीतील विजयानंतर अजून शर्यत संपलेली नाही, असा दृढ निश्चय व्यक्त करणाऱ्या सिंधूनं कडवा खेळ केला. झू-यिंगनं गुणाचे खाते उघडल्यानंतर सिंधूनं नेट जवळून खेळ करताना ५-२ अशी आघाडी घेतली. पण, तैपेईच्या खेळाडूनं सिंधूच्या शरिरावर फटके मारले. सिंधूनं ११-८ अशी आघाडी कायम ठेवली. ब्रेकनंतर तैपेईच्या खेळाडूनं सलग तीन गुण घेताना ११-११ अशी बरोबरी मिळवली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना अपोलो रुग्णालयात हलविले, मल्लिका दुआ यांची माहिती

News Desk

सेन्सेंक्स एक हजार अंकांनी कोसळला

swarit

#CoronaOutbreak | आता घराबाहेर पडताना मास्क घालणे अनिवार्य

News Desk