HW News Marathi
देश / विदेश

कतार ‘ओपेक’मधून बाहेर पडणार

कतार | जगातील सर्वात मोठा नैसर्गिक गॅसचा (एलएनजी) निर्यातदार देश असलेल्या कतारने लवकरच पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या संघटनेतून अर्थात ‘ओपेक’मधून बाहेर पडणार आहे. जानेवारी २०१९ ला कतार ‘ओपेक’मधून बाहेर पडणार असल्याची घोषणा कतारचे ऊर्जामंत्री साद-अल- काबी केली आहे.

कतार ‘ओपेक’मध्ये १९६१ साली सहभागी झाला होता. तर ‘ओपेक’मध्ये जगातील सर्वांत मोठा तेल उत्पादक देश सौदी अरेबियाचा दबदबा आहे. सध्या कतार आणि सौदी अरेबियातील द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत. याच दरम्यान, कतारने ‘ओपेक’मधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. कतारमध्ये प्रतिदिनी ६ लाख बॅरेल तेल उत्पादन घेतले जाते. मात्र, हा देश जगातील सर्वात मोठा एलएनजी गॅस निर्यातदार देश आहे.

दरम्यान, नैसर्गिक गॅस उत्पादनावर अधिक भर देणार असल्याचे सांगत कतारने आंतरराष्ट्रीय स्तरावर दीर्घकालीन धोरण अवलंबिण्याचे ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘ओपेक’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ओपेकचा सदस्य नसलेल्या रशियामधील तेल उत्पादन नोव्हेंबरमध्ये प्रतिदिनी ११.३७ दशलक्ष बॅरेल एवढे असून ओपेक सदस्य देश आणि रशिया जगातील एकूण तेल उत्पादनाच्या ४० टक्के उत्पादन घेतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“…सर्व समर्थक उड्या मारत होते”, पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर अप्रत्यक्षरित्या टीका

Aprna

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधींची निवड

News Desk

केजरीवाल पुन्हा एकाकी

News Desk
व्हिडीओ

ओवेसींना निजामांसारख हकलून लावणार…योगी

News Desk

तेलंगणा मध्ये येत्या ७ डिसेंबरला निवडणुका आहे. निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून निवडणूक प्रचारादरम्यान विविध पक्षांचे नेते एकमेकांवर वार पलटवार करतांना दिसून येत आहे. भाजपचं सरकार आल्यास ओवेसीनां निजामांसारख हकलून लावणार असं विधान योगींनी केलं होतं निवडणूक प्रचारासाठी तेलंगणामध्ये आले असता एका प्रचारसभेत ते बोलत होते त्यावर ‘एमआयएम’ पक्षाचे अध्यक्ष ओवेसींनी योगींवर पलटवार केला आहे.

Related posts

तुम्ही डाकूंसोबत गेलात, गद्दारी केली’, भररस्त्यात शेतकऱ्याने बच्चू कडूंना सुनावले

News Desk

“सत्य परेशान हो सकता है, पराजित नही”; Sushma Andhare यांची प्रतिक्रिया

News Desk

Chandrakant Patil Kolhapur | चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांसाठी भाजपचा मोर्चा

Gauri Tilekar