HW Marathi
देश / विदेश

राफेलची कागदपत्रे चोरी झालीच नाहीत | महाधिवक्ता

नवी दिल्ली | “राफेल कराराची कागदपत्रे चोरी झालीच नाहीत. मात्र, त्याच्या प्रति काढण्यात आल्या”, असे सांगत महाधिवक्ते के.के.वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. “माझ्या विधानाचा माध्यमांनी चुकीचा अर्थ लावण्यात आला. राफेल कराराबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रशांत भूषण आणि यशवंत सिन्हा यांनी या गोपनीय कागदपत्रांच्या प्रती सादर केल्या. त्यामुळे ती कागदपत्रे सार्वजनिक झाली. मात्र, ही कागदपत्रे चोरी झालेली नाहीत”, असेही वेणुगोपाल यांनी यावेळी म्हटले.

राफेल लढाऊ विमान करारासंबंधीची गोपनीय कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची माहिती बुधवारी (६ मार्च) महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली होती. राफेल करार प्रकरणी सुरु असलेल्या पुनर्विचार याचिकेदरम्यान राफेलची गोपनीय कागदपत्रे चोरी झाल्याचे महाधिवक्त्यांनी सांगितले होते. त्यानंतर, देशभरातून तसेच विरोधकांकडून मोदी सरकारवर मोठी टीका झाली. मात्र, आता राफेलची ही कदगपत्रे चोरी झालीच नसल्याचे महाधिवक्त्यांनी म्हटले आहे.

Related posts

298 भारतीय झाले पाकिस्तानी!

News Desk

टोल नाक्यांवर न्यायाधीश आणि व्हीआयपींना स्वतंत्र लेन | मद्रास उच्च न्यायालय

News Desk

माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी व्हेंटिलेटरवर 

News Desk