HW News Marathi
देश / विदेश राजकारण

मानहानी प्रकरण: राहुल गांधी शिक्षेविरोधात सूरत न्यायालयात याचिका दाखल करणार

मुंबई | मानहानी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शिक्षेविरोधातील याचिका सूरत सत्र न्यायालयात (Surat Sessions Court) दाखल करणार आहे. राहुल गांधींनी तब्बल 11 दिवसांनी त्यांना मिळालेल्या शिक्षेविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सूरत सत्र न्यायालयाने  मोदी आडनाव प्रकरणात 23 मार्च रोजी राहुल गांधींनी दोषी ठरविले असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर राहुल गांधींची लोकसभेची खासदारकी रद्द करण्यात आली. यानंतर देशभरात काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांसह मित्र पक्षांनी देखील आंदोलन केली.

 

सूरत सत्र न्यायालयात राहुल गांधींच्या नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी प्रियंका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि हिमाचल प्रदेशचे सुखविंदर सिंह सुखू हे मुख्यमंत्री न्यायालयात उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा न्यायालयात हजर राहणार आहेत.

 

नेमके काय आहे प्रकरण

काँग्रेस नेते राहुल गांधींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले होते. राहुल गांधींनी कर्नाटकात प्रचारासाठी गेले असताना ‘मोदी’ आडनावावरून टीका केली होती. “सर्वच चोरांचे नावे ही मोदी का असतात. यात नीरव मोदी, ललित मोदी अशी नावे घेतली,” असे विधान राहुल गांधी करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधीच्या विधानाचा आक्षेप घेत भाजप आमदार पूर्णेश मोदी त्यांच्याविरोधात  सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यावर सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सुनावली.

संबंधित बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! राहुल गांधींची खासदारकी रद्द; काय आहे प्रकरण?

लोकसभेतील खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Related posts

तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आला आहात, फेसबुकसारख्या माध्यमाचा दळभद्री वापर सुरू असेल तर….

News Desk

काँग्रेस नेता ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण

News Desk

शबरीमाला प्रकरण हे संघ-भाजपचे मोठे कारस्थान !

Gauri Tilekar