HW News Marathi
देश / विदेश

‘भाजप हिंदू विरोधी, लक्ष्मी आणि दुर्गेची शक्ती फक्त १०-१५ जणांच्या हाती’- राहूल गांधी

नवी दिल्ली | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नवीन चिन्ह आणि नवीन ध्वजाचे अनावरण केले. राजधानी दिल्लीत आयोजित या कार्यक्रमात महिला काँग्रेसचे नवीन चिन्ह प्रसिद्ध करण्यात आले. देशात आज RSS-BJP चे सरकार आहे. त्यांची आणि आपली विचारसरणी दोन्ही भिन्न आहेत, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

गेल्या १०० ते २०० वर्षांत कुणाला हिंदू धर्म समजला असेल तर ते महात्मा गांधी होते

आपण इतर कुठल्याही विचारसरणीशी तडजोड करू शकतो. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारसरणीशी कधीच समझौता करणार नाही. काँग्रेसची विचारसरणी ही गांधीजींच्या विचारांची आहे. भाजप- आरएसएसची विचारसरणी ही गोडसे आणि सावरकरांच्या विचारांची आहे. दोघांमध्ये फरक आहे. भाजपचे नेते म्हणतात आम्ही हिंदुत्ववादी आहोत. पण गेल्या १०० ते २०० वर्षांत कुणाला हिंदू धर्म समजला असेल तर ते महात्मा गांधी होते. भाजपलाही हे मान्य आहे. आरएसएसने हिंदूच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या. ज्याला संपूर्ण जग एक उदाहरण मानते. महात्मा गांधींनी अहिंसेला उत्तम प्रकारे समजून घेतले आणि समजावून सांगितले. हिंदू धर्म हा अहिंसेचा पाया आहे, मग त्यांना का गोळ्या का घातल्या गेल्या. याचा विचार करायला हवा, असं राहुल गांधी म्हणाले.

दिवाळीचा सण येतोय. लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही पाहिली आहे. माता लक्ष्मी म्हणजे काय? लक्ष्मी ही घरात पैसा आणणारी शक्ती आहे, असा त्याचा अर्थ नाही. तर लक्ष्मी म्हणजे एक ध्येय. एक राजकारणी, एक फुटबॉलपटू, ज्याचे ध्येय आहे, ते पूर्ण करणारी शक्ती म्हणजेच लक्ष्मी, असं राहुल गांधी म्हणाले. यावेळी राहुल गांधींनी महिला कामगारांना दुर्गाचा अर्थ विचारला. जी शक्ती संरक्षण करते तिला दुर्गा म्हणतात. दुर्गा आणि लक्ष्मी हे अधिकार प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही भेदभावाशिवाय पोहोचवण्याचे काम राजकारण्याचे असते. दुर्गा म्हणजे संरक्षण आणि लक्ष्मी म्हणजे ध्येय साध्य करण्याचे काम, असं राहुल गांधी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थमंत्री सीतारामन यांची 47,541 कोटींचा कर हस्तांतरणाचा आगाऊ स्वरूपातील हप्ता राज्यांना वितरीत करण्यास मान्यता

News Desk

अॅपलच्या एरिया मॅनेजरची गोळी घालून हत्या

News Desk

अवनीला ठार मारायचे नव्हते…पण परिस्थिती तशी होती !

News Desk