नवी दिल्ली | कॉंग्रसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी आज (१६ एप्रिल) झूमच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी देशावर आलेले कोरोनाचे संकट हे किती चिंताजनक आहे हे सांगितले. दरम्यान, या कोरोनाशी लढण्यासाठी राज्य आणि जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा उत्तम काम करत आहे. सध्या सगळ्यांनी एकत्र येऊन यो कोरोनाशी लढले पाहिजे असेही त्यांनी म्हटले.
I disagree with Narendra Modi with a lot of issues but now is not the time to fight. Unite and fight the virus: Rahul Gandhi pic.twitter.com/PDB8GqQ1XO
— ANI (@ANI) April 16, 2020
सध्या गरीबांना अन्नधान्यांची आणि पैशांचीही तितकीच गरज आहे. त्यामूळे त्यांच्यासाठी सरकारने आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले पाहिजे. यावेळी मोदींवर टीका करण्याची किंवा भांडण करण्याची ही वेळ नाही तर एकत्रित येऊन काम करण्याची वेळ आहे. मी मोदींच्या अनेक मुद्द्यांच्या विरुद्ध आहे. पण आता एकमेकांशी नाही तर सगळ्यांनी एकत्रित येत कोरोना या व्हायरसशी लढण्याची ही वेळ आहे, असेही राहूल गांधी म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.