HW News Marathi
देश / विदेश

#Coronavirus : पाकिस्तानने केली भारताकडे मदतीची मागणी

नवी दिल्ली | कोरोनाचा संसर्ग संपूर्ण जगभरात पसरला आहे. पाकिस्तानातही कोरोना मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. कोरोनासोबत लढण्यासाठी इम्रान खान यांनी भारताकडे मदत मागितली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. याआधी भारताकडे अमेरिका आणि ब्राझीलने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची मागणी केली होती. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकते असा अंदाज असल्याने सर्वच देशांमध्ये सध्या या औषधाला प्रचंड मागणी आहे.

पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही ६ हजारांवर असून १०० हून अधिक लोकांचा जीवही गेला आहे. त्यामूळे भारताकडे असलेले हे औषध कोरोनावार थोड्याफार प्रमाणात का होईना पण उपयुक्त ठरत असल्याने ही मागणी अनेक देशांकडून भारताकडे केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगात कच्चा तेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण

News Desk

केरळ विमान दुर्घटना कशी घडली ? प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय पाहिले ?

News Desk

आधार कार्डचा दुरुपयोग टाळण्यासाठी केंद्र सरकारने काढले ‘हे’ नवे आदेश; जाणून घ्या…!

Aprna