नवी दिल्ली | उत्तर प्रदेश येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. योगी सरकारच्या शिफारशीनंतर केंद्रानं हा तपास सीबीआयकडे दिला. मात्र, या प्रकरणावरून योगी सरकारवर होत असलेली टीका अजूनही थांबलेली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उत्तर प्रदेश पोलिसांवर घणाघाती टीका केली आहे.
“लज्जास्पद सत्य म्हणजे अनेक भारतीय दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे व त्यांच्या पोलिसांचं म्हणणं आहे की, कुणीही बलात्कार केला नाही. कारण त्यांच्यासाठी आणि इतर अनेक भारतीयांसाठी ती कुणीही नव्हती,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
The shameful truth is many Indians don’t consider Dalits, Muslims and Tribals to be human.
The CM & his police say no one was raped because for them, and many other Indians, she was NO ONE.https://t.co/mrDkodbwNC
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 11, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.