HW Marathi
Covid-19 देश / विदेश राजकारण

श्रमिक ट्रेनमध्ये स्थलांतरित मंजुरांचा मृत्यू जेवण-पाणी न मिळाल्यान झालेला नाही | पीयूष गोयल

मुंबई | देशात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मंजुरांचा देशाच्या विविध राज्यात अडकून पडले होते. या स्थलांतरित मंजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू होण्यापूर्वी विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सुरू केल्या. या श्रमिक ट्रेनद्वारे स्थलांतरित मंजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले. मात्र, या ट्रेनमध्ये ८० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. देशात कोणत्याही रेल्वेगाडीला पोहोचण्यासाठी ७ वा ९ दिवस लागलेले नाहीत. त्याचबरोबर एकाही प्रवाशाचा मृत्यू जेवण अथवा पाणी न मिळाल्यान झालेला नाही, असा दावा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे.

 

पीयूष गोयल म्हणाले, “देशात कोणत्याही रेल्वे ट्रेनला पोहोचण्यासाठी ७ वा ९ दिवस लागलेले नाहीत. त्याचबरोबर एकाही प्रवाशाचा मृत्यू जेवण अथवा पाणी न मिळाल्यान झालेला नाही,” असा दावा त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये शेअर केलेल्या  व्हिडिओमध्ये ते म्हणाले.  “रेल्वे प्रवाशांना १.९ कोटी रूपयांपेक्षा अधिक जेवण व १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त पाण्याच्या बॉटल रेल्वेद्वारे पुरवण्यात आले. रेल्वे मार्गातील अडथळ्यांमुळे काही रेल्वेगाड्या वळवण्यात आल्या. ज्याचे प्रमाण एकूण रेल्वेगाड्यांच्या तुलनेत १.७५ टक्के इतकेच आहे,” ते म्हणाले. केंद्राकडून स्थलांतरित मंजुरांच्या घरी सोडण्याची व्यवस्था केली. मात्र, ट्रेनमध्ये या मंजुरांना खाण्या-पिण्याची व्यवस्था नाही. तसेच गेल्या  १० दिवसांमध्ये या श्रमिक ट्रेनमध्ये ८० मंजुरांचा मृत्यू झालाचा दावा  खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला होता.

 

 

 

 

Related posts

पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी सिद्धूंना क्लीन चिट 

News Desk

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची लिफ्ट अवघ्या १५ दिवसात बंद

News Desk

पालघर प्रकरणावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

News Desk