HW News Marathi
देश / विदेश

राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट, चर्चांना उधाण

नवी दिल्ली | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची सोमवारी (८ जुलै) संध्याकाळी दिल्लीत भेट घेतली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील राज ठाकरे यांनी भाजपविरुद्ध विशेषतः पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याविरुद्ध प्रचार करत अप्रत्यक्षपणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला समर्थन दिले होते. याच पार्श्वभूमीवर या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या दोन नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा नेमका विषय आणि कारण अद्याप अस्पष्टच आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर येत्या निवडणुकांमध्ये नवी राजकीय समीकरणे पाहायला मिळणार का ? अशा चर्चा देखील सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

विधानसभा निवडणूक आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि सोनिया गांधी यांची ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. राज ठाकरे हे खरंतर मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले होते. ईव्हीएमबद्दल असलेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर येत्या निवडणुकीत बॅलेट पेपर पद्धतीचा वापर करण्यात यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली असून त्याबाबतचे पत्र देखील निवडणूक आयोगाला दिले आहे. दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारताची कारवाई पाकिस्तानच्या जिव्हारी, संसदेत दिले ‘इम्रान खान मुर्दाबाद’चे नारे

News Desk

बिहार निवडणूकीसाठी शिवसेनेला तुतारी वाजवणाऱ्या मावळ्याचे मिळाले चिन्ह

News Desk

काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा खतरनाक!

News Desk