नवी दिल्ली | ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’ म्हणजेच जमावाकडून होणाऱ्या हत्याकांडाचे, सामूहिक हत्याकांडाचे जनक राजीव गांधी असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत भाजपचे प्रवक्ते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी हे पोस्टर्स चौकाचौकात लावण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी विधान केले होते की, १९८४ मध्ये झालेल्या शीख दंगलीत काँग्रेसचा सहभाग नव्हता. त्यांच्या या विधानानंतर भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Yes Rajiv Gandhi is Father of Mob Lynching pic.twitter.com/8OAw7vOn2X
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) August 27, 2018
काँग्रेसने अनेकदा म्हटले की, मोदी सरकारच्या काळात जमावाकडून होणाऱ्या हत्यांचे प्रमाण वाढल्याचे आरोप केला आहे. गोहत्या गायींची वाहतूक, गोमांस अशा विविध मुद्यांवरून जमावाकडून हत्या झाल्याच्या घटना संपूर्ण देशभरात घडल्या आहेत. काँग्रेसने मोदी सरकारवर केलेल्या आरोपाचे भाजपचे पोस्टर लावून चोख उत्तर दिले आहे.
राहुल गांधी सध्या लंडन दौऱ्यावर असून त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये झालेल्या चर्चासत्रात बोलताना त्यांनी १९८४मध्ये झालेल्या शीख विरोधी हत्याकांड अतिशय वेदनादायी होते. कोणाही विरोधात कोणतीही हिंसा करणाऱ्यांना १०० टक्के शिक्षा व्हायला हवी. परंतु या हत्याकांडात काँग्रेसचा सहभाग नव्हता, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.