HW News Marathi
देश / विदेश

Ayodhya Verdict : मध्यस्थी समितीची नेमणूक

नवी दिल्ली | अयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणात आज (८ मार्च) सुनावणीदरम्यान मध्यस्थी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी हा निर्णय दिला आहे. या समितीत श्री. श्री. रवि शंकर, ज्येष्ठ वकील श्रीराम. पंचू आणि न्यायमुर्ती खल्लीफुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रकरणात नेमलेल्या मध्यस्थाच्या बैठकचा निर्णय दर १४ दिवसांनी त्रिसदस्यींनी समितीने न्यायालायला कळवावी लागणार आहे. आठ आठवडे चालणार असून या कालावधी दरम्यान त्यांनी आपले मत माडावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगण्यात आले आहे.

या समितीचे कामकाज गोपनीय असणार असून न्यायालय त्यावर लक्ष ठेवून असणार आहे. तसेच न्या. खलीफुल्ला हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तसेच मध्यस्थ समितीच्या कामकाजाची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यास बंदी घालण्यात आली आहे. समितीचे कामकाज इन कॅमेरा होणार असून सर्व प्रक्रिया फैजाबादमध्ये होणार आहे.

 

Related posts

पाकिस्तान सरकारकडून १८२ मदरशांवर नियंत्रण

News Desk

कोरोना लसीबाबत सोनिया गाांधींची पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे ‘ही’ मागणी

News Desk

#Lockdown : राष्ट्रीय महामार्गावर २० एप्रिलपासून टोलवसूलीला होणार सुरुवात

News Desk