HW News Marathi
देश / विदेश

जागतिक महिला दिनानिमित्ताने गुगलने दिले १४ भाषेतील प्रेरणादायी संदेश

नवी दिल्ली | जगभरात आज (८ मार्च) जागतिक महिल दिन उत्साहाने साजरा केला जात आहे. महिलांच्या कतृत्व, जिद्दीचा आणि सशक्तीकरणाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या दिनानिमत्ताने आज गुगलने १४ स्लाइडच्या माध्यमातून १४ वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रेरणादायी संदेश दिले आहेत.

गुगलच्या डुडलवर क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या भाषेतील कोट्स आपण पाहू शकता. त्याबरोबर महिलांची नावे देखील वाचू शकता. त्‍यामध्ये भारतीय महिला बॉक्‍सर मेरी कोमचेही नाव आहे. मेरी कोमने यामध्ये महिलांना उद्‍देशून म्‍हटलय की, “तुम्‍ही एक महिला आहात म्‍हणुन स्‍वत:ला कमी लेखू नका.” गुगलचे हे स्लाईड सोशल मीडियावर देखील शेअर करण्याचा ऑप्शन देण्यात आला आहे.

गुगलच्या या विशेष डूडलमध्ये १४ भाषांचा समावेश करण्यात आला आहे. या चित्रावर क्‍लिक केल्‍यास वेगवेगळ्‍या भाषेतील कोट्‍स आपल्‍याला दिसतात. यासोबतच त्‍या महिलांची नावेही आपण वाचू शकतो. ज्‍या महिलांनी हे कोट्‍स दिले आहेत, या डूडलच्या विशेष स्‍लाईडला सोशल मीडियावर शेअर करण्याचा ऑप्शनही देण्यात आला आहे. यामध्ये समाविष्‍ट केलेले प्रेरणादायी कोट्‍स जगभरातील प्रतिभावंत महिलांच्या समुहाव्दारे बनविण्यात आले आहे.

जपान, अमेरिका, भारत, जर्मनी, मॅक्सिको, ब्राझील, रशिया मधील विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या महिलांचा समावेश डुडलमध्ये करण्यात आला आहे. लेखक, अंतराळवीर, डॉक्टर, खेळाडू अशा विविध महिलांचे प्रेरणादायी संदेश देण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्राने १९७५मध्ये ८ मार्च हा जागतिक महिला दिन असल्याची घोषणा केली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतातून पाकिस्तानात वाहून जाणाऱ्या ३ नद्यांचे पाणी वळविणार, केंद्राचा निर्णय

News Desk

मनसेचा झेंडा हटवला गेला….मनसैनिक कोणता झेंडा घेणार हाती ?

Arati More

मुंबईत शरद पवारांच्या उपस्थित होणार शेतकरी आंदोलन !

News Desk