HW News Marathi
देश / विदेश

राम रहिमला कोर्टातून गायब करण्याचा कट, तीन पोलिस कर्मचारी कटात सहभागी, तिघाना अटक

चंदिगड साध्वीवर बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत रहिमला कोर्टातूनच गायब करण्यात कट रचल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कटात तीन पोलिस कर्मचारी सामिल होते. तीनही पोलिस कर्मचा-यांना अटक करण्यात आले असून हे तिघेही हरियाना पोलिस कर्मचारी आहेत. यात दोन हेडकॉन्स्टेबल. अमित, राजेश आणि असून एक कॉन्स्टेबल राजेश असे नाव आहेत. राम रहीमला सीबीआय विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा हे तिघेही सुरक्षेत सहभागी होते.

पंचकुला येथे तिन्ही पोलीस कर्मचा-यांना चौकशीला बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली अशी माहिती पंचकुलाचे पोलीस उपायुक्त मनबीर सिंग यांनी दिली आहे. तिघांवर देशद्रोहाचा आरोपही लावण्यात आला आहे. ’25 ऑगस्ट रोजी राम रहीमच्या सुरक्षेचा भाग असलेल्या हरियाणाच्या तीन पोलीस कर्मचा-यांना आम्ही अटक केली आहे’, अशी माहिती पोलीस उपायुक्त मनबीर सिंग यांनी दिली. हरियाणा पोलिसांनी राम रहीमच्या सुरक्षेसाठी तैनात असणा-या पाच पोलीस कर्मचा-यांचं निलंबन केलं आहे. याशिवाय पंजाबमधील तीन पोलीस कर्मचा-यांना अटक करण्यात आली आहे.

एकूण सातजणांनी मिळून राम रहीम यांना पळवून नेण्याचा कट आखला होता. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये हरियाणाच्याच काही पोलिसांचाही समावेश होता. तर इतर दोनजण खासगी सुरक्षा रक्षक होते. मात्र या सातजणांची तिथे तैनात असलेल्या इतर पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांना कटाचा अंदाज आल्यामुळे राम रहीमला पळवण्याचा कट फसला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रा. अभय अष्टेकर यांना आइन्स्टाईन पुरस्कार

News Desk

Union Budget 2021 | सोने आणि चांदी स्वस्त होणार

News Desk

खड्ड्यामुळे दरदिवशी सहा जणांचा बळी

News Desk