HW Marathi
Covid-19 देश / विदेश

सावधान! कोरोनाचा पीक अजून बाकी, AIIMS चे संचालक रणदीप गुलेरीयांचा गंभीर इशारा

नवी दिल्ली |  देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. एकीकडे ही चित्ता असताना एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरीया यांनी अतिशय गंभीर इशारा दिला आहे. कोरोनाचा पीक येणे बाकी असल्याचा दावा दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केला आहे. वैयक्तिक स्तरावर योग्य काळजी घेतली जात नाही. अनेक ठिकाणी अजूनही लोकांची गर्दी दिसून येत आहे.

अशामुळे कोरोना संसर्ग पसरत आहे. त्यामुळे तूर्त एप्रिल अखेरपर्यंत अथवा मेच्या मध्यापर्यंत रूग्णसंख्येत वाढ होईल. ही रूग्णवाढ २ ते ३ आठवड्यांपर्यंत कायम राहील, त्यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन गुलेरिया यांनी यानिमित्ताने केले आहे.

कोरोनाचे छोटे ड्रापलेट जमिनीवर न पडता काही काळ हवेत राहत आहेत. त्यामुळे हवेतून संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. संसर्ग स्वतःला म्युटेंट करत राहतो. अनेक म्यूटेशनमुळे संसर्ग त्याचे रूप बदलतो. त्यामुळे संसर्गाच्या म्यूटेशनवर पाळत ठेवून त्यानुसार उपचार पद्धतीत बदल करण्याची गरज गुलेरियांनी व्यक्त केली आहे.

जसा संसर्गात बदल होत जाईल,तसा लसीत बदल करावा करावा लागेल असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. तसेच, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविषयी लोकांमध्ये गांभीर्य नसल्याने कोरोनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करून त्यांना सुरक्षित करणे हाच मार्ग उरला असल्याचे गुलेरिया म्हणाले आहेत.

Related posts

राजनाथ सिंहांनी केली राफेलची पूजा, भारतीय वायू दलाच्या ताफ्यात

News Desk

शशिकला यांच्याविरोधात माझ्याकडे सबळ पुरावे- डी. रुपा

News Desk

देशातील प्रसिद्ध सांस्कृतिक स्मारके ६ जुलैपासून खुली केली जाणार?

News Desk