HW News Marathi
देश / विदेश

आरबीआयकडून रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात

मुंबई | रिझर्व्ह बँकेने आज (४ एप्रिल) यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिले तिमाही पतधोरण जाहीर केले आहे. सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. रेपो रेटमध्ये २५ बेस पॉईंट्सची कपात करण्यात आली आहे. आता नवीन 6.25 टक्क्यांवरुन 6 टक्के झाला आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्याने कर्जावरील व्याज कमी होते. रिव्हर्स रेपो रेट आता ५.७५ टक्के असणार आहे. आर्थिक वर्ष २००२० मध्ये विकासदर ७.२ टक्के राहील असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

याआधी ७ फेब्रुवारी रोजी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात करून तो ६.२५ टक्के निश्चित केला होता. आता त्यात आणखी ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे गृह तसेच अन्य कर्जांचा मासिक हप्ता कमी होणार आहे. आरबीआयने पूर्वीच्या तुलनेत तटस्थ धोरण ठेवले आहे. याबाबत आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांता दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय दुसऱ्या पतधोरण समितीची बैठक झाली. त्यात रेपो दर कमी करण्यावर ४ विरुद्ध २ असे मतदान झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘संजय राऊत,निर्लज्जपणालाही मर्यादा असतात…’ भाजपचे नेते का खवळले ?

News Desk

७ राज्यातील २६ जागांसाठी राज्यसभेत आज मतदान

News Desk

२० वर्षांपूर्वी मसूद अजहरची सुटका कोणी केली ?, सिद्धूंचा भाजपला सवाल

News Desk