HW News Marathi
देश / विदेश

आरबीआयकडून नव्या २० रुपयांच्या नोटेवर महाराष्ट्रातील वेरुळच्या लेणीचे चित्र

नवी दिल्ली | भारतीय चलनात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आज (२७ एप्रिल) २० रुपयांची नव्या रुपातील नोट दाखविण्यात आली आहे. आरबीआयने यापूर्वी ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आणल्या आहेत. त्यापाठोपाठ २००, १००, ५० आणि १० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत.

या नव्या २० रुपयाची नोटेचा रंग हा हिरवट पिवळा असा समिश्र आहे. या नोटेच्या मागील बाजूस सांस्कृतिक वारसा असलेल्या महाराष्ट्रातील वेरुळच्या लेणीचे चित्र आहे. या नव्या नोटेवर आरबीआय गर्व्हर्नर शक्तीकांत दास यांची सही आहे. या नोटेची साईज ६३ एमएम बाय १२९एमएम अशी आहे. दरम्यान २० रुपयाच्या सध्या चलनात असलेल्या नोटांचा देखील वापर कायम राहणार आहे. आरबीआयच्या वेबसाईटवर या नोटेचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनंत हेगडे आणि चेतन भगत यांच्यात ट्विट वॉर

swarit

जल्लोष कर्नाटक विजयाचा…

News Desk

काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत जवानांकडून २ दहशतवाद्याचा खात्मा

News Desk