June 26, 2019
HW Marathi
देश / विदेश

गुजरातमध्ये रेड अलर्ट जारी, १२ तासात ‘वायू’ चक्रीवादळ धडकणार

नवी दिल्ली | अरबी समुद्रातील वायू चक्रीवादळ मुंबईच्या किनारपट्टीपासून अवघ्या ६३० किमी दूर आहे. मुंबईच्या किनारपट्टीला वायू वादळाचा धोका नाही. तरीही मच्छिमारांनी आज (१२ जून) आणि उद्या (१३ जून) खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने गुजरातच्या किनारपट्टी भागात दक्षतेचा इशारा दिला आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण (एनडीआरएफ) दलाची पथके गुजरातमधील सौराष्ट आणि कच्छ भागात तैनात केली आहेत.

गुजरातमधील १० जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना १३ ते १४ जूनदरम्यान सुट्टी जाहीर केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काही कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच   गुजरामध्ये कच्छपासून दक्षिण गुजरातमधील समूची तटरेखा येथे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी दिली. येत्या १२ तासाच हे वादळ गुजरातच्या किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी पर्यटकांना सुरक्षितस्तळी जाण्याचे सांगितले आहे. यामुळे मुंबईसह ठाणे, पालघर भागात जोरदार पाऊस पडणार आहे. यामुळे सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

 

Related posts

पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मेजरसह ४ जवान शहीद

News Desk

…प्रेत जेव्हा उठून बसते

News Desk

सिंगापूरमध्ये आज ‘किम-ट्रम्प’ भेट

News Desk