HW News Marathi
देश / विदेश

आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिसवा सरमांवर गुन्हा दाखल

आसाम | हिंसाचारावरून आसाम आणि मिझोराम यांच्यातील संबंध ताणले गेले असतानाच आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरमा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हिमांता बिसवा सरमा हे नवनिर्वाचित मुख्यमंत्री असून भाजपने त्यांना संधी दिली आहे. गेल्या महिन्याभरापासून पूर्वेकडील आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमध्ये तणाव वाढला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आसाम आणि मिझोरमच्या सीमेवर संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे दोन्ही राज्यांमध्ये तणावाचे वातावरण असून, आता त्यात भर पडण्याची शक्यता आहे. कारण आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात मिझोरममध्ये FIR दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याआधी दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी एकमेकांविरोधात समन्स बजावल्याचं समजवतं आहे.

२६ जुलैवा आसाम आणि मिझोराम सीमेवर दोन्ही राज्यांचे पोलीस आणि सुरक्षादल एकमेकांसमोर येऊन झालेल्या गोळीबार आणि झटापटीत काही पोलिसांचा मृत्यू झाला होता. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली. यावरून मिझोरम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात FIR दाखल केला असून, झटापट, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची सांगितले जात आहे. याशिवाय २०० अज्ञात पोलिसांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिझोरामच्या खासदारांनाही पाठवली नोटीस

आसाम आणि मिझोरामच्या सीमारेषेवरील कचर भागात काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला. यात आसामच्या पाच पोलिसांचा मृत्यू झाला. पोलिस अधिकारी वैभव निंबाळकर हे जखमी झाले. या प्रकरणात शुक्रवारी आसाम प्रशासनाने मिझोरामच्या संबंधित कोलासिब जिल्हा प्रशासनातील सहा अधिकाऱ्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली. त्याशिवाय, मिझोरामचे राज्यसभेतील एकमेव खासदार के. वनलेवना यांना देखील नोटीस दिली आहे.

सरमा यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा

एकीकडे आसामने शुक्रवारी मिझोराममधील पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली, तर दुसरीकडे मिझोरामनं चक्क आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्याविरुद्ध गुन्हाच दाखल केला आहे. ज्या दिवशी गोळीबाराची घटना घडली, त्याच दिवशी आसामचे मुख्यमंत्री आणि इतर सहा अधिकाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सरमा यांच्यासह आयजीपी अनुराग अगरवाल, कचरचे डीआयडी देवज्योती मुखर्जी, कचरचे किर्ती जल्ली, कचरचे डीएफओ सुन्यदेव चौधरी, कचरचे एसपी वैभव निंबाळकर, ढोलाई पोलिस स्थानकाचे ओसी साहब उद्दीन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंतरराष्ट्रीय वेबसाईट्सना जगभरात Error, ‘या’ साईट्स ओपनच होईनात…

News Desk

इस बात पर त्यागपत्र… राजीनामा तो बनता है साहेब, संजय राऊतांचा शेतकरी आंदोलनावरुन मोदींवर निशाणा

News Desk

मोदी सरकारकडे ‘अर्थ’ नसला तरी ‘शब्दरत्न’ बक्कळ आहेत असाच त्याचा अर्थ !

News Desk