HW News Marathi
देश / विदेश

त्रिपुरामधील कम्युनिस्टांचे सरकार उलथवून टाका –  रामदास आठवले

त्रिपुरामधील कम्युनिस्ट सरकार दलित आदिवासिंचा केवळ निवडणुका जिंकण्यासाठी वापर करीत आहे मात्र निवडणूका जिंकून सत्तेतआल्यानंतर दलित आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे कम्युनिस्ट सरकार दुर्लक्ष करीत आहे. मागील 25 वर्ष त्रिपुरात सत्तेत असलेल्या कम्युनिस्टांनीदलित आदिवासींचा नोकरीतील अनुशेष सुद्धा भरलेला नाही. दलित आदिवासींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या त्रीपुरातील कम्युनिस्टांचे सरकारउलथवून टाका असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार राजू दास हे सुराज्यामणीनगर या विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढतआहेत त्यांच्या प्रचारसभेत ना रामदास आठवले बोलत होते. यावेळी ईशान्य भारत रिपाइं चे प्रभारी निरीक्षक विनोद निकाळजे ; रिपाइंचे त्रिपुराअध्यक्ष ऍड. बी सी दास आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

त्रिपुरा विधानसभेच्या एकूण 60 जागा असून 59 जागांवर रिपब्लिकन पक्षाने भाजपला पाठिंबा दिला असून एका जागेवर रिपब्लिकन पक्षनिवडणूक लढत आहे.त्रिपुरा मध्ये दलित आदिवासींच्या हितासाठी कम्युनिस्टांचे सरकार उलथवून लावावे लागेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्यानेतृत्वात भाजपला रिपाइं चे एनडीए चा घटक पक्ष म्हणून त्रिपुरात सत्तांतर घडविण्यासाठी भाजप ला रिपाइंचे समर्थन असल्याचे ना रामदासआठवले म्हणाले. दलित आदिवासींच्या हितासाठी कम्युनिस्टांचे सरकार उलथविणे गरजेचे असून त्यासाठी भाजपला बहुमताने समर्थन देण्याचेआवाहन ना रामदास आठवले यांनी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑस्ट्रेलियाचे भारतीय उच्चायुक्त barry o’farrell Ao कडून मुख्यमंत्र्यांना मराठीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा

News Desk

नकारात्मक क्रूड तेलाच्या किमतीचा अर्थ म्हणजे भारतीय ग्राहक इंधनासाठी कमी पैसे देतात का?

News Desk

21 नावाने दाऊदचा जगभर वावर

News Desk