मुंबई | अखिल भारतीय हिंदू महासभेने केंद्राकडे महात्मा गांधी यांचा फोटो चलनातून काढून त्या जागी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो लावण्यात यावा त्याचबरोबर सावरकरांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावे अशी मागणीही केली आहे.
ऑल इंडिया हिंदू महासभेचे म्हणणे आहे की, भारताच्या स्वातंत्र्यामध्ये वीर सावरकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.त्यामुळे त्यांचा फोटो भारतीय चलनावर मुद्रित करुन त्यांना सन्मानित केले पाहिजे. विनायक दामोदर सावरकर यांनी सर्वप्रथम ‘हिंदुत्व’ या विषयाला चर्चेत आणले आणि त्यांनी १९२३ साली ‘हिंदुत्व’ या विषयावर एक पुस्तक देखील लिहिले.
भारतीय चलनावर सावरकरांचा फोटो व भारतरत्न पुरस्काराने सरकारने गौरव करा यासाठी अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी सरकारला ३० दिवसांचा अवधी दिला आहे. या कालावधीत सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा इशारा देखील स्वामी चक्रपाणी यांनी सरकारला दिला आहे.
महात्मा गांधींचे अस्तित्व संपविण्यासाठी हे एक मोठे षडयंत्र आहे. त्यामुळे कॉंग्रेस हा हिंदुत्वाचा अजेंडा यशस्वी होऊ देणार नाही असे काँग्रेसचे म्हणणे आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान म्हणाले आमचा इतिहास बदलण्याचा हा प्रयत्न आहे. २०१९ च्या निवडणुकांच्या दृष्टीने हे लोक अजेंडा बनवत आहेत हा अजेंडा कॉंग्रेस कधीही यशस्वी होऊ देणार नाही असेही ते यावेळी बोलताना म्हणालेत.
Akhil Bharat Hindu Mahasabha (ABHM) requested Centre to replace photograph of Mahatma Gandhi from the Indian currency with social reformer Veer Savarkar.
Read @ANI story | https://t.co/wAzFmCdg2m pic.twitter.com/UucxroIeed
— ANI Digital (@ani_digital) May 29, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.