HW News Marathi
देश / विदेश

उत्तर भारतात पुन्हा वादळाचा फटका, ४१ जणांचा बळी

नवी दिल्ली | धुळीचे वादळ आणि अवकाळी पावसामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश आणि दिल्लीत एकूण ४१ जणांचा बळी गेला असून मोठी नुकसानही झाले.पश्चिम बंगालमध्ये वादळात ४ मुलांसह १२ जणांचा बळी गेला तर उत्तर प्रदेशात १८ जणांचा बळी व दिल्लीत २ जण ठार झाले.

उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी विजेचे खाम कोसळले तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला. रेल्वे आणि हवाई वाहतूकही विस्कळीत झाली. १० दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड आणि पंजाब येथे आलेले वादळाने १३४ जणांचा मृत्यू झाला होता.

हवामान विभागनुसार, या वादळाचा तडाखा हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरयाणा, चंदीगढ, मध्यप्रदेश, झारखंड, आसाम, मेघालय, महाराष्ट, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांतील काही भागातही बसला. दिल्लीत १०९ किमी प्रति तास या वेगाने धुळीचे वादळ आले. त्यामुळे दोन जण ठार आणि १९ जण जखमी झाले. मेट्रो वाहतुकीलाही याचा फटका बसला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घोटाळेबाज सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर जेलचे पाहुणे होणारच ! सोमय्यांचा इशारा

News Desk

आता दहशतवाद्यांचा खात्मा करण्याआधी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का ?

News Desk

सरकार स्थिर, आता अनेक जण आमच्याकडे येणार हे स्वाभाविकच !

News Desk