HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तर पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा!

नवी दिल्ली | देशभरात आज ७२वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. याच निमित्ताने तीन नव्या कृषी कायद्यांचा विरोध करणारे शेतकरी राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीही काढणार आहेत. त्यामुळे दिल्लीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ७२व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी ट्वीट केलं आहे की, “देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद!”

 

तसेच,दिल्ली पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. कर्नाल रोडवर कंटेनर लावले आहेत. सिंघु आणि टिकरी सीमेवर हजारोंच्या संख्येने ट्रॅक्टर आहेत. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना मध्य दिल्लीत रॅली काढण्यास परवानगी दिलेली नाही.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशाची राजधानी दिल्लीमध्ये ३ नव्या कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली आहे. या ट्रॅक्टर रॅलीमध्ये हजारो ट्रॅक्टरचा समावेश असू शकतो. याचा पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी देशाच्या राजधानीत कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धावत्या ट्रेनसोमर सेल्फी घेण्याचा स्टंट फसला

News Desk

पाकिस्तानच्या कुरघोड्यांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याला हाय अलर्ट

News Desk

बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेना आणि माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडें आमने-सामने

News Desk