नवी दिल्ली | डॉलरच्या तुलनेत रुपया आता आणखीच कमकुवत होण्याची शक्यता बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) इकोरॅप या संशोधन अहवालात वर्तविण्यात आली आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 71.69 रुपयांवर पोहोचला असून काल (मंगळवारी) रुपया 71. 58 रुपयांवर होता.
सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया 71.37 रुपये इतका झाला असून रुपयाची जर अशी वारंवार घसरण झाली तर भारतीय अर्थव्यवस्था पुरती कोलमडेल. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने भारताचा रुपया कमकुवत बनला आहे.
जून २०१८ पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात वाढ केल्यामुळे ६.२ टक्क्यांनी रुपयाची घसरण झाली आहे. डॉलर मजबूत आणि रुपया मात्र कमकुवत अशी स्थिती पुढे काही दिवस कायम राहणार असल्याची माहिती या अहवालातून मिळत आहे.
सद्यस्थिती लक्षात घेता डॉलरच्या तुलनेत रुपया 72-73 रुपयापर्यंत पोहचण्याची शक्यता असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Indian #Rupee now at 71.87 versus the US dollar. pic.twitter.com/YlBv94YoWc
— ANI (@ANI) September 5, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.