HW News Marathi
देश / विदेश

रशियाचे राष्ट्रपती पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली । रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे आजपासून भारत दौऱ्यावर असणार आहेत. भारत आणि रशियामध्ये एस-४०० क्षेपणास्त्र करार होणार असल्याची माहिती मिळत आहे. या करारासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीसाठीचा हा करार ५अब्ज डॉलरचा असणार आहे. पुतीन हे यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. तर शुक्रवारी पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात चर्चा होणार आहे.

भारताने रशियाच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. भारत-रशिया या दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध आणि संरक्षण कराराच्या दृष्टीने पुतीन यांची ही भारतभेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर अंतराळ क्षेत्रातील संशोधन आणि उर्जा क्षेत्रातील सहकार्याच्या मुद्द्यावरदेखील यावेळी चर्चा करण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२२ साली मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेसाठी रशिया भारताला प्रशिक्षण देण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दौ-यात एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीसंदर्भात पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यातअधिकृत चर्चा करणार आहेत, अशी माहिती रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. भारताची दरवर्षी होत असलेल्या द्विपक्षीय चर्चांमध्येदेखील रशियाचा समावेश आहे.

Related posts

मोदी-शहा पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी उद्या पुण्यात येणार

News Desk

नापासांची चालढकल अखेर रद्द

News Desk

देशात ‘कोरोना’च्या रुग्णांची संख्या २९ वर,आरोग्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिले निवदेन

swarit