नवी दिल्ली । केरळमधील सबरीमाला मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सर्व वयोगटातील स्त्रियांना आता सबरीमाला मंदिरात प्रवेश खुला करण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. स्त्रिया या पुरुषांपेक्षा दुय्यम नाहीत. स्त्री-पुरुषामध्ये भेदभाव करणे अत्यंत चुकीचे आहे. देवाशी असलेले नाते हे शारीरिक घटकावर ठरू शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
Right to worship is given to all devotees and there can be no discrimination on the basis of gender: Chief Justice of India Dipak Misra. SC has allowed entry of all women in Kerala’s #Sabarimala temple pic.twitter.com/jGdRMlH1l6
— ANI (@ANI) September 28, 2018
प्रवेशबंदीचे कारण काय ?
गेल्या अनेक वर्षांपासून केरळमधील सबरीमाला मंदिरात विराजमान असणारे अयप्पा हे ब्रह्मचारी असल्याने या मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील स्त्रियांना प्रवेश दिला जात नव्हता. सबरीमाला यात्रेच्या आधी ४१ दिवस कठोर व्रत करावे लागते. मासिक पाळीमुळे महिला सलग ४१ दिवस व्रत करता येऊ शकत नाही. स्त्रियांवर देवाची पूजा करण्यावरून अटी-बंधने घालणे चूक असून प्रत्येकाला देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
The practice of barring women in age group of 10-50 to go inside the temple is violative of constitutional principles: Chief Justice of India Dipak Misra. #SabarimalaVerdict pic.twitter.com/jhYEqnEhwv
— ANI (@ANI) September 28, 2018
मंदिर प्रशासन काय म्हणते
सबरीमाला मंदिराकडून महिलांबरोबर कोणताही भेदभाव केला जात नसून न्यायालयाने धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करू नये अशी उलट भूमिका मंदिर प्रशासनाने घेतली होती. ‘१० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात जाण्यापासून रोखल्यास ते संविधांचे उल्लंघन करणारे ठरेल,’ असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सबरीमाला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. तो निर्णय आज अखेर सुनावण्यात आला आहे.
Supreme Court allows entry of women in Kerala’s #Sabarimala temple. pic.twitter.com/I0zVdn0In1
— ANI (@ANI) September 28, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.