दिल्ली | राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र सचिन पायलट यांनी आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले आहे. सचिन पायलट भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार असून यावेळी त्यांच्या भाजपा प्रवेशाची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण सचिन पायलट यांनी एनडीटीव्हीशी बोलताना हे वृत्त फेटाळून लावले आहे. सचिन पायलट यांनी रविवारी आपल्याला पक्षाच्या ३० आमदारांसह काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत अशोक गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला आहे.
मात्र सचिन पायलट यांनी आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले आहे. सचिन पायलट भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची आज भेट घेणार असून यावेळी त्यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण सचिन पायलट यांनी एनडीटीव्हीशी बोलताना हे वृत्त फेटाळून लावले आहे. सचिन पायलट यांनी काल (१२ जुलै) पक्षाच्या ३० आमदारांसह काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, अशोक गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावाही त्यांनी केला होता.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर सत्ताधारी काँग्रेसने काल(१२ जुलै) रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली. यावेळी, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी काँग्रेसने व्हीप जारी केला. तसेच, दिल्लीवारीवर असलेले राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्याने संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.