HW News Marathi
देश / विदेश

ज्योतिरादित्य शिंदे यांना ‘ऑपरेशन कमळ’चे सूत्रधार केले आहे – सामना अग्रलेख

मुंबई | राजस्थानच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजप आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. देश कोरोना संकटाशी लढाई देत असताना भाजपने एक वेगळाच उपद्रव मांडला आहे. याचवेळी भाजपने मध्य प्रदेशात कॉंग्रेसचे कमलनाथ सरकार पाडले.

विरोधकांची सरकारे अस्थिर करायची या सूत्राने केंद्रीय सत्ता काम करत आहे. देशापुढे कोरोनाने कोसळलेली अर्थव्यवस्था, लडाखमधील चीनची घुसखोरी असे अनेक प्रश्न आहेत. लडाख सीमेवरील आपल्या २० सैनिकांचे सांडलेले रक्त अजून ताजे आहे. हे सर्व प्रश्न सोडवायचे राहिले बाजुला, काँग्रेसच्या अंतर्गत भांडणात टांग टाकून घोडेबाजारास उत्तेजन देण्याचे काम राजस्थानत सुरु आहे.

वाळवंटात राजकीय उपद्वाप करुन वादळ निर्माण करुन भाजप काय साध्य करणार आहे, अशाने संसदीय लोकशाहीचे वाळवंट होईल, असा स्पष्ट इशारा शिवसेनेने ‘सामना’तून दिला आहे. त्याचवेळी लोकशाही टिकवायची असेल तर देशाची संपूर्ण सत्ता असणाऱ्या भाजपने विरोधकांसाठी काही घरे सोडायला हवीत, तरच लोकशाहीची शान राहिल, असे देखील अग्रलेखात म्हटले आहे.

मध्य प्रदेशात कॉंग्रेसचे ज्योतिरादित्य सिंधिया २२ आमदारांसह भाजपमध्ये झाले. बक्षीस म्हणून सिंधिया यांना राज्यसभा मिळाली. भविष्यात ते मंत्रीही होतील. मध्य प्रदेशातील घास गिळंकृत करण्यात आला तेव्हा लोकांना खात्री होती की पुढचा नंबह राजस्थानचा असेल. तेथील उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे ज्योतिरादित्य सिंधियाच्या मार्गावर जातील, असे पैजा लावून सांगितले गेले. हे खरे असल्याचे दिसते.

सचिन पायलट राजस्थानमध्ये ३० आमदारांसह बंड केल्याची बोंब आहे. पण हा आकडा फुगवलेला आहे. २०० सदस्यांच्या राज्यस्थान विधानसभेत कॉंग्रेसचे १०७ आणि भाजपचे ७२ आमदार आहेत. अपक्ष व इतर आमदारही सरकारसमवेत होते. त्यातील काही परंपरेनुसार कुंपणावर बसले आहेत.

पायलट यांचा दावा आहे की, आता कॉंग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. पायलट जरी खरे असले तरी सरकारचे भवितव्य विधानसभेत ठरवले जाईल. विधिमंडळ पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी बोलावलेल्या कॉंग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत दहा ते बारा समर्थक पायलट आमदारही उपस्थित होते. त्यामुळे विधानसभेतील वास्तविक संख्या कळू शकेल. जोपर्यंत आमदारांची प्रमुख मोजणी केली जात नाही, भारतीय जनता पक्ष उघडपणे काही करणार नाही. परंतु सरकारला अस्थिर करण्यासाठी त्यांचे राष्ट्रीय कार्य पडद्यामागे सुरु आहे.

सध्या पायलट यांचा पोरखेळ हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे भाजपच्या दृष्टीने सांगितले जात आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांना फूस लावून फोडले तेव्हाही भाजपच्या दृष्टीने हा काँग्रेसअंतर्गत प्रश्चच होता आणि आता पायलट यांची खेळी हादेशील अंतर्गत प्रश्नच आहे. महाराष्ट्रात अजित पवारांना घेऊन भाजपने सकाळीच शपथविधी उरकला. तेव्हाही तो राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय होता. त्यामुळे अशा अंतर्गत बाबाी सोयीप्रमाणे ठरत असतात.

मुख्यमंत्री गेहलोत यांनी भाजपवर जो घोडबाजाराचा आरोप केला तो गंभीर आहे. एका एका आमदाराला २५ कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे. तसे व्यवहार सरु आहेत. पण आता आयकर विभागाच्या धाडी पडत आहेत, त्या गेहलोत यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांवर. हे गूढ आणि सहस्यमय आहे.

पायलट यांनी काँग्रेस सोडावी यासाठी मध्य प्रदेशमधून फुटलेले ज्योतिरादित्य शिंदे हे परिश्रम घेत आहे. बाटगा जरा जास्तच जोराद बांग देतो, त्यातलाच हा प्रकार आणि यापासून कोणताही पक्ष दूर नाही. राजकारणात बाटग्यांना महत्व मिळते हा प्रकार नवा नाही. पायलट विरुद्ध गेहलोत यांचा झगडा हा त्यांचा अंतर्गत वाद असेल तर भाजपने सध्या तरी त्या झगड्यात पडू नये, पण भाजप याक्षणी कुंपणावर आहे आणि त्यांनी फुटण्याचा ताजा अनुभव असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना ‘ऑपरेशन कमळ’चे सूत्राधार केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शास्री भारतीय संघाचे प्रशिक्षक

News Desk

पंतप्रधानांकडून मराठीमधून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

News Desk

तामिळनाडुमध्ये वादळग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय नौसेना दाखल

News Desk