नवी दिल्ली | पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावामुळे समझौता एक्स्प्रेस रेल्वे सेवा बंद केली होती. एक्स्प्रेस आज (४ मार्च) पुन्हा सुरू झाली आहे. लाहोर येथून रविवारी (३ मार्च) निघालेली ही एक्स्प्रेस आज १५० प्रवाशी प्रवास करत असल्याची माहिती पाकिस्तानी रेडिओने दिली आहे. तर दिल्लीतून बुधवारी (६ मार्च) समझौता एक्स्प्रेस १३ प्रवाशांना घेऊन रविवारी अटारीकडे रवाना होणार आहे.
Punjab: Samjhauta Link Express has arrived at Attari. The train left from Old Delhi railway station yesterday as normal service resumed. The train had been suspended by both India and Pakistan after IAF strike in Pakistan. pic.twitter.com/tXyi3kJHKr
— ANI (@ANI) March 4, 2019
समझौता एक्सप्रेस ही लाहोर ते दिल्ली अशी ही रेल्वे धावत असून ही एक्स्प्रेस लाहोर येथून दर सोमवारी आणि गुरुवारी रवाना होते. तर दिल्लीतून बुधवारी आणि रविवारी लाहोरच्या दिशनेने रवाना होते. गेल्या आठवड्या भरापूर्वी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) एक्सप्रेस थांबविण्यात आली होती. पुन्हा एकदा ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना परतवून लावताना भारतचे मिग-२१ विमान पडले आणि भारतीय वायू दलाचे कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या हाती लागले. भारताची कठोर कारवाई आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानने शांततेच्या प्रस्तावाचे कारण पुढे करत कमांडर अभिनंदन यांची सुटका केली. आता अभिनंदन यांच्या सुटकेनंतर समझौता एक्स्प्रेस पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे अद्यापही सुरूच आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.