HW News Marathi
देश / विदेश

‘त्या’ २२० जागांमध्ये संगमनेरदेखील असेल !

मुंबई | “भाजप सरकार विधानसभा निवडणुकीत देखील २२० जागांचे उद्दिष्ट साध्य करणार आहे. या २२० जागांमध्ये संगमनेरच्या जागेचा देखील समावेश असणार आहे”, असा दावा राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. संगमनेर येथे आयोजित व्यापारी असोसिएशनच्या कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी येथील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणूक काहीच महिन्यांवर येऊन ठेपल्याने राज्यात निवडणुकांचे वारे वाहायला सुरुवात झालेली असताना दुसरीकडे मात्र राज्य भीषण पूरस्थितीचा सामना करत आहे.

“संगमनेरच्या बाजारपेठेने या तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर व्यापारी आणि उद्योजकांनी उपस्थित केलेल्या शंका आणि यातील त्रुटींवर केलेल्या सूचनांचा सरकारकडून स्वीकार करण्यात आला आहे. बांधकाम व्यवसायाशी २६ घटक जोडले गेलेले आहेत. त्यामुळे बाजारात मंदी आहे. याबाबत मी केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून या व्यवसायाला दिलासा देण्यासाठी प्रयत्न करू”, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्नीला गोळी मारण्यापेक्षा तिहेरी तलाक देऊन मुक्तता देणे केव्हाही चांगले !

News Desk

श्रीनगरमधील पोलीस चौकीत दहशतवादी हल्ला

News Desk

नीरव मोदी ब्रिटनमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिली माहिती

swarit