नवी दिल्ली | “आपली देशभक्ती सिद्ध करण्यासाठी सेलेब्रिटींना कोणत्याही हल्ल्यानंतर ट्विट किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट करणे आवश्यक असल्याचे अनेकांना वाटते. खरंतर सेलेब्रिटींवर अशा टीका करणाऱ्या व्यक्ती या स्वतः नैराश्याने ग्रस्त असतात”, असे संतप्त विधान भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने केले आहे. सानिया मिर्झाने ट्विट करून पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहिली. मात्र यावेळी नेटिझन्सनी तिला प्रचंड ट्रोल केले. त्यानंतर सानियाने या सर्वांना कडक शब्दात सुनावले आहे.
We stand united 🕯 #PulwamaAttack pic.twitter.com/Cmeij5X1On
— Sania Mirza (@MirzaSania) February 17, 2019
“आपली देशभक्ती सिद्ध करण्यासाठी सेलेब्रिटींना कोणत्याही हल्ल्यानंतर ट्विट किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट करणे आवश्यक असल्याचे अनेकांना वाटते. सेलेब्रिटींना देशाप्रती प्रेम वाटते की नाही हे यातून सिद्ध होते असा त्यांचा समज आहे. खरंतर सेलेब्रिटींवर अशा टीका करणाऱ्या व्यक्ती या स्वतः नैराश्याने ग्रस्त असतात. राग व्यक्त करण्यासाठी त्यांना कोणी भेटत नाही. म्हणून ते अशा पद्धतीने द्वेष पसरवतात”, अशा शब्दांत सानियाने नेटिझन्सना सुनावले आहे.
Saddened at the attack on our CRPF soldiers in #Pulawama ..my sincere condolences to the families.. there is no place for terrorism in the world.. prayers for peace .. #PulwamaAttack
— Sania Mirza (@MirzaSania) February 15, 2019
“मी भारताला पदक मिळवून देण्यासाठीच मेहनत घेते. मी देशासाठी खेळून देशाची सेवा करते. मी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहे. आपले संरक्षण करणारे हे जवानच खरे नायक आहेत. १४ फेब्रुवारीचा दिवस हा काळा दिवस होता. मी अशी आशा करते की असा दिवस आपल्याला पुन्हा पाहायला मिळू नये”, असेही सानियाने यावेळी म्हटले आहे. मूळची भारतीय असणाऱ्या सानियाने मिर्झाने पाकिस्तानी क्रीडापटू शोएब मलिकशी विवाह केल्यानंतर कायमच सानियाला भारत-पाकिस्तान वादात ओढण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्यानंतर जगभरातून पाकिस्तानला प्रचंड मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. अनेक सेलिब्रिटींनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.