HW News Marathi
देश / विदेश

माझी निष्ठा काँग्रेसच्या विचारसरणीवर आहे, कोणत्या व्यक्ती किंवा कुटुंबावर नाही – संजय झा

मुंबई | राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरून सचिन पायलट यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांचे समर्थन करणारे काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी निलंबित केले. त्यानंतर संजय झा यांनी ट्विट केले आहे. यात त्यांनी असे लिहिले आहे की, माझी निष्ठा काँग्रेसच्या विचारसरणीवर आहे कोणत्या कुटुंबावर किंवा व्यक्तीवर नाही. मी गांधी आणि नेहरूवादी कायम राहीन. आणि माझ्या पक्षाच्या विरुद्ध काहीही चुकीचे घडत असल्यास त्याविरुद्ध मी आवाज उठवेन, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

या आधी संजय झा यांनी, “२०१३ ते २०१८ ही पाच वर्षे सचिन पायलट यांनी काँग्रेससाठी रक्त, अश्रू, कष्ट आणि घाम दिले. काँग्रेस २१ जागांसारख्या अत्यंत वाईट स्थितीतून १०० वर परत आली. मात्र आम्ही त्यांना नुकताच कामगिरीचा बोनस दिला. आम्ही किती गुणग्राहक आहोत. आम्ही खूप पारदर्शक आहोत.” असे उपरोधक ट्वीट त्यांनी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब

Aprna

राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने नागरिकांना भेट, ऑनलाईन तपासा सर्व तपशील

News Desk

२८ ऑगस्टला होणार मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील सुनावणी

News Desk