HW News Marathi
देश / विदेश

संस्कृत केवळ ब्राम्हणांची भाषा नाही

नागपूर- भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी, हा प्रस्ताव संविधान निर्मिती सभेच्या बैठकीत ठेवला होता. असे भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी म्हणाले आहेत. प्रज्ञाभारती डॉ. श्रीधर वर्णेकर जन्मशताब्दी महोत्सव समितीतर्फे आयोजित मानवंदना कार्यक्रमात ते बोलत होते. संस्कृत ब्राह्मणांची भाषा आहे असे कुणी म्हटले नव्हते. परंतु राजकारणामुळे संस्कृतचा पराभव झाला. संस्कृतमध्ये सर्वच विज्ञानांचा समावेश असून केवळ पूजा अर्चनेची ती भाषा नाही असं जोशी यावेळी म्हणाले.

दुसरीकडे, संस्कृत बाबतचे गैरसमज दूर झाले पाहिजेत,संस्कृतला लोकाभिमुख करून समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचवले पाहिजे, संस्कृतचे योग्य मार्केटिंग करण्यात संस्कृतप्रेमी कमी पडले असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता ड्रगप्रकरणी NCB ने कंगनाची स्वतःहून चौकशी करावी !

News Desk

भारतीय जवानांनी पाकिस्तानचे १२ बंकर्सही उध्वस्त

News Desk

ट्रम्प-जोंग यांच्या भेटीचा मुहूर्त अखेर ठरला

News Desk