नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत बुहमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदी आज (३० मे) शपथ घेणार आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सायंकाळी सात वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांच्या पदी खासदार संतोष गंगवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गंगवार हे उत्तर प्रदेशातील बरेथी येथून निवडून आहे.
Santosh Gangwar, BJP on reports that he is likely to be appointed as Pro-tem Speaker of 17th Lok Sabha: I can't be the Pro-tem Speaker after becoming a Minister. Someone else will get that post. I will carry out whatever responsibility will be given to me. pic.twitter.com/OKlZV84mkT
— ANI (@ANI) May 30, 2019
लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी मनेका गांधी आणि संतोष गंगवार या दोघांची नावे आघाडीवर होती. दोन्ही नेते आठवेळा खासदार राहिले असून सध्या संसदेतील सर्वात ज्येष्ठ सदस्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. म्हणूनच १७ व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली आहे.
लोकसभेतील सर्व सदस्यांना शपथ देणे आणि त्यांचे स्वागत करणे, आदी स्वरुपाची जबाबदारी लोकसभा हंगामी अध्याक्षांची असते. आठवेळा लोकसभेचे सदस्य राहिलेले संतोष गंगराम हे ज्येष्ठ सदस्य असल्याने त्यांच्याकडे हंगामी सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.