HW Marathi
देश / विदेश

दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना

नवी दिल्ली | दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली आहे.  ‘नॅशनल स्टूडंट्स युनियन ऑफ इंडिया’ या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची माहिती मिळली आहे. या घटनेविरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून दिल्ली विद्यापीठातील कला विभागाच्या बाहेर सुभाषचंद्र बोस, भगतसिंह आणि विनायक दामोदर सावरकर यांचे पुतळे बसवण्यात आले होते. अभाविप प्रमुख शक्ती सिंह यांच्या पुढाकाराने हे पुतळे बसवण्यात आले आहेत. मात्र याला एनएसयूआयने आक्षेप घेतला होता. यावरुन विद्यापीठात सध्या तणावाचे वातावरण होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांच्या पुतळ्यासोबत सावरकरांचा पुतळा बसवला जाऊ शकत नाही, असा आक्षेप ‘एनएसयूआय’ने घेतला. त्यानंतर गुरुवारी (२२ ऑगस्ट) ‘नॅशनल स्टूडंट्स युनियन ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करत, ‘भगतसिंह अमर रहें’ आणि ‘बोस अमर रहें’ अशी घोषणाबाजीही केली. शिवाय त्यांच्या कृत्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

 

Related posts

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा चकमक, हाय अलर्ट लागू

Gauri Tilekar

पंतप्रधान मोदींनी घेतली चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

News Desk

‘फनी’ चक्रीवादळ ओडिसा किनारपट्टीवर धडकले, वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात

News Desk