HW News Marathi
देश / विदेश

‘आधार’ वैध की अवैध?

नवी दिल्ली | आधार कार्ड वैध की अवैध याबद्दल आज (बुधवारी २६ सप्टेंबर)ला सर्वोच्च न्यायालय महत्त्वपूर्ण निकाल देणार आहे. न्यायालयात आधार कार्डच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या २७ याचिक दाखल झाल्या असून या याचिकांवर गेल्या काही महिन्यापासून युक्तिवाद सुरू आहे. या युक्तीवादनंतर न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला होता.

आधार कार्डच्या याचिकेवर जानेवारी महिन्यात सुनावणीला सुरुवात झाली होती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने केंद्र सरकार आणि याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद ऐकला. त्यानंतर आधार कार्डमुळे देशातील नागिराकंच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग होतो का, याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल. भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला गोपनीयतेचा अधिकार दिला आहे. त्यामुळे सरकार न्यायालया काय निर्णय देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्डची अनिवार्य

केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केले होते. त्यामुळे नागरिकांना बँक खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड, वाहन परवाना तयार करण्यासाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली. एवढेच नव्हे तर मोबाईल नंबर आणि बँक खाते देखील आधारशी जोडण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या, यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप नोंदवला. आधार कार्ड सक्तीमुळे नागरिकांच्या मुलभूत अधिकर भंग होत असून गोपनीयता संपुष्टात येत असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ठरलं ! बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार १५० जागा

News Desk

कोरोनाचा विळखा ! मुंबईतील ३ डॉक्टर्स, २६ नर्सेस कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी संतोष गंगवार यांची नियुक्ती

News Desk
क्रीडा

सर्वोच्च कामगिरी केलेल्या क्रीडापटूंना राष्‍ट्रपतींच्या हस्‍ते पुरस्कार प्रदान

Gauri Tilekar

नवी दिल्ली | भारताचे राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्‍ते भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला व्हेटलिफ्टर मीराबाई चानू यांना आज देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबतला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

भारतात क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात प्रदान करण्यात येतो. गेल्‍या काही दिवसांपूर्वी या पुरस्कारांसाठी खेळाडूंची शिफारस करण्यात आली होती. क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी देशातील क्रीडापटूंना दरवर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. २० सप्टेंबर रोजी विविध क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. या सर्व क्रीडापटूंना आज राष्‍ट्रपतींच्या हस्‍ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सन्मान प्राप्त झालेला विराट कोहली हा तिसरा क्रिकेटपटू आहे. याआधी सचिन तेंडूलकर आणि एम.एस. धोनी याना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आलेले क्रीडापटू

भालाफेकपटू नीरज चोप्रा, धावपटू जिन्सन जॉन्सन, हिमा दास, बॅडमिंटनपटू एन. सिक्की रेड्डी, बॉक्सर सतीश कुमार, महिला क्रिकेटर स्मृती मंधाना, गोल्फपटू शुभंकर शर्मा, हॉकीपटू मनप्रीत सिंग, सविता, पोलो खेळाडू रवी राठोड, नेमबाज राही सरनोबत, अंकूर मित्तल, श्रेयासी सिंग, टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा, जी. सथीयान, टेनिसपटू रोहन बोपण्णा, कुस्तीपटू सुमीत, वुशू खेळाडू पूजा कंदियन, पॅरा ॲथलेटिक्स खेळाडू अंकूर धर्मा, मनोज सरकार अशा एकूण २० क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेले क्रीडापटू

बॉक्सर कुटप्पा, वेटलिफ्टर विजय शर्मा, टेबिल टेनिसपटू श्रीनिवास राव, ॲथलेटिक्स खेळाडू सुखदेव सिंग पन्नू या चार क्रीडापटूंना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Related posts

आंतरराष्ट्रीय धावपटू परविंदर चौधरीची गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

…तर २०२३ वर्ल्डकपच्या यजमानपदाला भारत मुकणार

News Desk

दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून पृथ्वी शॉची माघार

News Desk