HW News Marathi
देश / विदेश

५० टक्के शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसह ‘या’ राज्यांत शाळा सुरू होणार

नवी दिल्ली | कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. मात्र आता हळूहळू काही नियम शिथिल केले जात आहेत. अशात आता अनलॉक-४ च्या प्रक्रियेत आजपासून (२१ सप्टेंबर) अनेक गोष्टी सुरु करण्यात येणार आहेत. आजपासून सांस्कृतिक, मनोरंजन, धार्मिक, राजनितिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये १०० लोकांना मास्क लावून सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.

ओपन एअर थिएटर्सही उघडण्यास आजपासून परवानगी देण्यात आली आहे. तसेच देशातील १० राज्यांमध्ये योग्य ती काळजी घेऊन इयत्ता ९वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्यात येणार आहेत. बिहार, राजस्थान, हरियाणा, चंदिगड, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मेघालय, नागालँड या राज्यांत आजपासून ५० टक्के उपस्थितीसह शाळा सुरु करण्यात येणार आहेत. तर उत्तर प्रदेश, झारखंड, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगाल येथे शाळा अद्याप सुरू करण्यात येणार नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता शाळा सुरू करता येणार नसल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

काय असणार अटी?

– फक्त ५० टक्के शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसह शाळा सुरू होणार

– पालकांच्या लेखी परवानगीने विद्यार्थी शाळेत येऊ शकतील

– कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व उपाय केले जातील, तसेच सर्व अटी शर्थींचं पालन करण्यात येईल

– मास्क आणि सोशल डिस्टंन्सिग बंधनकारक असणार आहे

– शाळेच्या गेटवर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल

– सध्या ज्या शाळा कन्टेन्मेट झोनमध्ये नाहीत त्याच सुरू होणार

– कन्टेन्मेट झोनच्या बाहेर असणाऱ्या शाळांमध्येही फक्त त्याच विद्यार्थी आणि शिक्षकांना परवानगी देण्यात येणार जे कन्टेन्मेट झोनमध्ये राहत नाहीत.

– शाळेत येणारे विद्यार्थी, शिक्षण आणि कर्मचाऱ्यांनाही कन्टेन्मेट झोनमध्ये जाण्याची परवानगी नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियाकडून ‘सेऊल शांतता पुरस्कार’ प्रदान

News Desk

…तर कोरोना आणखी वाढण्याचा धोका, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३१ वर ! देशात सर्वाधिक कोरोनारूग्ण महाराष्ट्रात

Arati More