HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर | काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा येथे भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. सैन्याच्या ३ आरआर आणि एसओजी यांच्या संयुक्त पथकाने आज (२५ एप्रिल) सकाळी बंगेंदर मोहल्ला येथे सर्च ऑपरेशन सुरू केले होते. येथे दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलातील जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.

यावेळी दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून सफदेर आमिन भट आणि बुरहान अहमद गनी अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक रायफल आणि एक एसएलआर जप्त केली आहेत. चकमकीत मारले गेलेले हे दोघेही दहशतवादी हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेचे असल्याची माहिती मिळाली आहे.

यापूर्वी २० एप्रिल रोजी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली होती. सोपोरमधील वाटरगाम येथे झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठाक केले होते. शोपियां भागात १३ एप्रिल रोजी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्याआधी ६ एप्रिल रोजी इमाम साहिब भागात सुरक्षा जवानांनी दोन दहशतवाद्यांना मारले होते. तर २८ मार्च रोजी सुरक्षा दलाने शोपियां आणि हंदवाडा येथे पाच दहशतवाद्यांना मारले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद यांच्या नावाने ओळखला जाणार!

Jui Jadhav

Gandhi Jayanti : गांधींच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींचा खास लेख

News Desk

#PulwamaAttack : भारताच्या इतिहासातील जवानांवरील ‘हे’ सर्वात मोठे हल्ले

swarit