HW News Marathi
देश / विदेश

ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांना ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली | ज्येष्ठ पत्रकार आणि एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीचे मॅनेजिंग एडीटर रवीश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना हिंदी टीव्ही पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरीसाठी जाहीर झालेला आहे. आशिया खंडातील नोबल पुरस्कार म्हणून गणला जाणारा मॅगसेसे पुरस्कार आहे.

रवीश कुमार यांचा एनडीटीव्हीवरील प्राईम टाईम शोमध्ये सामान्य जनतेचे वास्तव आणि अनेक समस्यांना वाचा फोडली जाते. रवीश कुमार हे सहावे पत्रकार आहेत ज्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. रवीश कुमार यांच्याआधी हा पुरस्कार अमिताभ चौधरी(१९६१), बीजी वर्गीय(१९७५), अरुण शौरी(१९८२) आर के लक्ष्मण(१९८४), पी, साईनाथ(२००७) यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

फिलिपाईन्सचे माजी राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार शासकीय सेवा, सार्वजनिक सेवा, सामूहिक नेतृत्त्व, पत्रकारिता तसेच साहित्य, शांतता आणि उदयोन्मुख कागिरी करणाऱ्यांना दिला जातो. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे आचार्य विनोबा भावे हे पहिले भारतीय होते. १९५८ मध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यानंतर मदर तेरेसा (१९६२), जयप्रकाश नारायण (१९६५), सत्यजीत रे (१९६७), चंदी प्रसाद भट्ट (१९८२), अरुण शौरी (१९८२), किरण बेदी (१९९४), अरविंद केजरीवाल (२००६), पी साईनाथ (२००७) यांचाही प्रतिष्ठित रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरव केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुषमाजींच्या वचनबद्धतेची तुलना कशाशीही होऊ शकत नाही !

News Desk

#PulwamaAttack : जावेद अख्तर-शबाना आझमी देशद्रोही, सिद्धूची गाढवावरुन धिंड काढावी !

News Desk

कंत्राटदारांनी शिवस्मारकाच्या रचनेत स्वतःला वाटतील तसे बदल केले !

Gauri Tilekar